सामान्य माणूस आर्थिक अडचणीमुळे आरोग्य व शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेचा प्रयत्न असून जोपर्यंत सामान्य माणूस विकसित होत नाही तोपर्यंत कोकण विकास अशक्य - शिवसेना उपनेते व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे
सामान्य माणूस आर्थिक अडचणीमुळे आरोग्य व शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा प्रयत्न असून जोपर्यंत सामान्य माणूस विकसित होत नाही तोपर्यंत कोकण विकास अशक्य असल्याचे शिवसेना उपनेते,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे यांनी सांगितले.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर येथे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय याचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर भंडारी भवन, गुहागर येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्रचे संस्थापक व शिवसेना - उपनेते निलेश भगवान सांबरे यांचा संस्था व गुहागर शिवसेना व गुहागर तालुका वासिया यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर प. पू. सदगुरू श्री आलोकनाथजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र भोगवती नगर, तानसा), गुहागर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिवसेना गुहागर तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, प्रेरणादायी व्याख्याते गणेश शिंदे, दिनेश निमसे, संस्था जिल्हा अध्यक्ष ॲड..महेंद्र मांडवकर, कुणबी समाजोन्नती संघ गुहागर तालुका अध्यक्ष पांडुरंग पाते, माजी अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, पांडुरंग पाते, संस्थेचे सचिव केदार चव्हाण,ॲड. प्रसाद जांगळे , धनंजय शिगवण, अनंत डिंगणकर, साहिल आरेकर, ॲड. प्रमेय आर्यमाने, अनिकेत मोरे, साहिल रेवाळे, महेश भाटकर, प्रकल्प संचालक संदीप पाटील यांच्यासह जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना उपनेते व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी सांगितले की,या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यामध्ये एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी तज्ञ मार्गदर्शन कडून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत च्या शिपाई पासून ते मंत्रालयातील सचिवापर्यंत आपली माणसे तयार करणे गरजेचे आहे. ते काम संस्थेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीत आहे. रत्नागिरी येथील भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयामध्ये मोफत वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. रुग्णालयाच्या वतीने मोफत वैद्यकीय शिबीरे घेतली जात आहेत, याव्यतिरिक्त अनेक क्लिनिक ठाणे व पालघर जिल्ह्यात कार्यरत आहेत,याव्यतिरिक्त सीबीएससी शाळा निर्माण करून हजारो विद्यार्थी याचा लाभ घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. या व्यतिरिक्त महिला सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण वर्ग आणि अनेक उपक्रम राबवले जात आहेत ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी जे नीट चे पूर्णपणे मोफत निवासी प्रशिक्षण वर्ग तज्ञ मार्गदर्शक द्वारे चालवली जात आहेत दिव्यांग मुलांची निवासी शाळा देखील निशुल्क चालवली जाते अनेक रुग्णवाहिका पाचही जिल्ह्यात मोफत सुविधा देत आहेत या सर्व प्रकल्पातून आजपर्यंत लाखो लाभार्थ्यांना लाभ झाला आहे हजारो मुलांची शासकीय नोकरीत निवड झाली आहे या सामाजिक व शैक्षणिक व आरोग्य व महिला सक्षमकरणासाठीच्या कार्याचा विस्तार संपूर्ण कोकणभर पसरलेला आहे.या सामाजिक कार्याचा एकच उद्देश आहे की सामान्य माणूस आर्थिक अडचणीमुळे आरोग्य व शिक्षणापासून वंचित राहू नये कारण जोपर्यंत सामान्य माणूस विकसित होत नाही तोपर्यंत कोकण विकास अशक्य आहे, कोकणातील पाचही जिल्ह्यामध्ये या संस्थेचे काम मोठ्या प्रमाणात होत असून लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ होत आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तरुण-तरुणी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment