गुहागर तालुका सेवा समितीवतीने जिल्हा परिषद शाळा वाकी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
अनंत श्रीविभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य , श्रीस्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून गुहागर तालुका सेवासमितीतर्फे गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाकी येथे वह्या,पेन व शैक्षणिक साहित्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले.सध्याच्या युगात वाढत चाललेले शिक्षणाचे महत्त्व डोळ्यासमोर ठेऊन तसेच काही विद्यार्थ्यांना परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित होऊ नये हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाप्रसंगी गुहागर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर भिलारे , जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे रत्नागिरी जिल्हा निरीक्षक तावडे गुरुजी,जिल्हा सेवा अध्यक्ष दत्तात्रय मोरे,जिल्हा सचिव महेंद्र कदम,युवा पीठ निरीक्षक सुनील वीर,प्रोटोकॉल अधिकारी भाई कदम,गुहागर तालुकाध्यक्ष धनश्री मांजरेकर, ज्येष्ठ गुरुबंधू दिलीप बागकर,जिल्हा परिषद शाळा वाकी चे सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. सदरच्या उपक्रमाबाबत जि.प.शाळा वाकीतर्फे धन्यवाद मानण्यात आले.
Comments
Post a Comment