खार येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते व विभागप्रमुख ॲड.अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र.९८ तर्फे तक्षशिला अकादमी,१३/१९ वा रस्ता,खार पश्चिम,मुंबई - ४०० ०५२ येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना शाखाप्रमुख प्रफुल्ल घरत, कार्यालयप्रमुख व तक्षशिला अकादमीचे संचालक तुषार शेलार, महिला शाखा संघटिका पल्लवी आरोलकर, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एस. आर. ए.चे अध्यक्ष जितेंद्र जाधव, उपशाखाप्रमुख अमित तळपदे, प्रसाद माळी आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment