भाजपाच्या वतीने काताळे, पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
महाराष्ट्र राज्याचे लाडके, कार्यकुशल, कार्यसम्राट मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी साजरा होतो. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही हा वाढदिवस कोणतीही जाहिरात अथवा प्रसिद्धीचे कार्यक्रम न करता शैक्षणिक साहित्याचे वाटप किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक सहकार्य करून करण्याचे आवाहन आदरणीय देवेंद्रजींनी केले होते,त्यानुसार गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पडवे आणि काताळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नं १, तवसाळ अंगणवाडी,तांबडवाडी शाळा,बाबरवाडी शाळा,माध्यमिक विद्यालय पडवे,पडवे मराठी शाळा,काताळे शाळा नं.१,काताळे नवानगर शाळा,काताळे नवानगर उर्दु शाळा ,केंद्रीय शाळा पडवे उर्दु या ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले. भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी या ९ शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मुख्यमंत्री सन्मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी काताळे ग्रामपंचायत सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे, पडवे ग्रामपंचायत सरपंच मुजीफ जांभारकर ,तवसाळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश गडदे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष विनायक सुर्वे, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश सुर्वे,पडवेचे विनायक भोसले,काताळे ग्रामपंचायत सदस्य मधुकर अजगोलकर, जैद भाटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य लैबर जांभारकर, अंगणवाडी सेविका श्रीमती छाया सुर्वे, मदतनीस श्रीमती मनीषा मयेकर याच बरोबर जि. प.आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे राठोड सर, काताळे शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका माधवी पाटील मॅडम, कांबळे सर, नवानगरचे गुरसुळे सर,पडवे शाळेचे पावरी सर, संजय राठोड सर, तवसाळ बाबरवाडी शाळेचे कोकाटे सर, तवसाळ तांबडवाडी शाळेचे संदीप भोई सर, साईनाथ पुजारा सर, पडवे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी. सूर्यवंशी, सहशिक्षक पी.जी. वेलुंडे, एस.एम.सूर्यवंशी, लिपिक राहुल कांबळे, प्रशांत सुर्वे, काताळे नवानगर उर्दूच्या मुख्याध्यापिका शाहीन मॅडम, उपशिक्षिका उजवा मॅडम, पडवे उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख परवेज अ.रशिद चिपळूणकर. मुख्याध्यापक महमद सलीम अजगर कारभारी,सह शिक्षक रमजान फुरकान जांभारकर, दाऊद साहेब हमीद जांभारकर, शिक्षण सेविका जुलेखा इरफान हातवडकर, रुखसार या.गनि मेमन आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ या वह्या वाटपाच्या वेळी उपस्थित होते.
माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्मा.निरंजन जी डावखरे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले. काताळे आणि पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांना एकाच दिवशी शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम हा पहिल्यांदाच राबविला गेला असून तो निलेश सुर्वे यांनी राबविला याबद्दल सर्व शिक्षक वृंद आणि या दोन्ही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थांकडून निलेश सुर्वे यांचे कौतुक आणि आभारही व्यक्त केले जात आहे. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम करत असताना आपल्या परिसरात अनेक विषयांसाठी निधी खर्ची पाडणाऱ्या निलेश सुर्वे यांनी यावेळी या शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांना दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने धन्यवाद देण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment