आबलोली येथील ज्येष्ठ समाजसेवक अनंत कृष्णा पागडे यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
कुणबी समाजोन्नत्ती संघ मुंबई संलग्न शाखा तालुका गुहागर आयोजित विद्यार्थी गुणगौरव व जेष्ठ समाज सेवकांचा जाहीर सत्कार समारंभ दिनांक 27/07/2025 रोजी कृष्णा मंदिर हॉल नायगाव, मुंबई येथे नुकताच पार पडला.
या कार्यक्रमामध्ये आबलोली येथील ज्येष्ठ समाजसेवक अनंत कृष्णा पागडे यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. अनंत कृष्णा पागडे हे मुंबई येथे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 01/06/1985 मध्ये शिपाई म्हणून कामाला लागले. अपार मेहनत, जिद्द व चिकाटी च्या जोरावर रेकॉर्ड किपर म्हणून पदोन्नती होऊन शेवटी 01/06/2024 रोजी सन्मान पूर्वक सेवा निवृत्त झाले.
अनंत कृष्णा पागडे हे जरी कामाला मुंबई येथे असले तरी आबलोली गावातील गावकर म्हणून कामकाज पहात आलेले आहेत. त्या सोबतच ते रत्नागिरी जिल्ह्यात समाजात समाज सेवेमध्ये कायमच अग्रेसर राहिले आहेत. तसेच कोकणची लोककला अर्थात नमन याची त्यांना खूप आवड. ही कला जोपसण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबात पत्नी व दोन मुलगे व सुना नातवंड असे त्यांचे एकत्र कुटुंब आहे.
त्यांचा असा सत्कार झाला त्याबद्दल आबलोली ग्रामस्थांच्या वतीने आबलोली गावचे खोत सचिन कारेकर, ज्येष्ठ समाजसेवक यशवंत पागडे, माजी सरपंच व खालील पागडेवाडी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गोणबरे, पोलीस पाटील महेश भाटकर, दिनेश शिंदे तसेच माजी सरपंच ॲड. प्रमेय आर्यमाने या सर्वांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment