भाजपा गुहागर तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी भारतीय जनता पक्ष गुहागर तालुका वतीने सकाळी १०:०० ते दुपारी २:००वाजेपर्यंत गुहागर ग्रामीण रूग्णालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी श्रीफळ वाढवून केले. रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील टीम रक्त संकलन करण्यासाठी आली होती. या रक्तदान शिबीरात ५५ जणांची नोंदणी झाली आरोग्य पथकाकडून परिपूर्ण तपासणी केल्यानंतर २८ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. या रक्तदान शिबीरावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, डॉ सौ. विनिता नातू, भाजपा गुहागर माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, चिपळूण माजी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, सचिन ओक, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, मंगेश रांगळे, अरूण गांधी, संगम मोरे, विनायक सुर्वे, पंचायत समिती माजी सदस्य विजय भुवड, संजय मालप, उमेश भोसले,आशिष विचारे, महेश तोडणकर, अपूर्वा बारगोडे, प्रांजली कचरेकर, काताळे सरपंच प्रियांका सुर्वे, ज्योती परचुरे, वृक्षाली ठाकूर, स्मिता जांगळी, संदिप हळदणकर, हेदवी उपसरपंच एकनाथ बसणकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment