गोरेगाव पश्चिम येथे प्रबोधन मित्र मंडळ (ट्रस्ट) आयोजित दोन दिवसीय भव्य आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

प्रबोधन मित्र मंडळ (ट्रस्ट) आयोजित फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई शाखा यांच्या माध्यमातून चंद्रमणी बुध्द विहार, तीनडोंगरी यशवंत नगर रोड नं-१, गोरेगाव (प.) मुंबई येथे दोन दिवसीय निःशुल्क भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. यावेळी संस्थापक-अध्यक्ष (समाजसेवक) किरण जाधव यांचेसह मंडळाचे पदाधिकारी दत्ता सावंत, सतिश लाड, विशाल इनकर, राम पाटील, श्रीनिवास गर्गे, सुरेश मेंगू, अविनाश मस्तुद, महेश दिटी, नरेश मुधारी, सतिश दिटी, यादगिरी नागुला, नरेश रागला तसेच महात्मा फुले व इतर स्थानिक सोसायटीचे अशोक गायकवाड, मोहन इनकर, मिलिंद जाधव, गौतम औसरमल तसेच अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

Comments