गुहागर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उबाठा गटातून शिंदे गटात पक्षप्रवेश
शिवसेना शिंदे गटात उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक माजी जिल्हा परिषद सदस्य, तीन माजी सभापती यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती गुहागर विधानसभा मतदारसंघ समन्वयक विपुल कदम यांनी दिली. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.सदरचा पक्षप्रवेश गुहागर तालुक्यातील हेदवी हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ३ वाजता होणार आहे. विपुल कदम यांनी सांगितले की, या पक्षप्रवेशांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील गुहागर तालुका महिला संघटक व माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर, माजी गुहागर पंचायत समिती सभापती विलास वाघे, दत्ताराम निकम, पुनम पाष्टे तसेच या जिल्हा परिषद गटातील एकूण सहा सरपंच यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सदरचे सर्व पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नक्कीच शिवसेनेमध्ये मानाचे स्थान देण्यात येईल, हे सर्व कार्यकर्ते स्व इच्छेने येत आहेत त्यांचे राजकीय भवितव्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचे बळ, ताकद वाढविण्यासाठी ते पक्षप्रवेश करत असल्याचे विपुल कदम यांनी सांगितले. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून गुहागर तालुक्याला पुढील काळात जास्तीत जास्त निधी मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी सांगितले. सध्या पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी पालकमंत्री यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे दीपक कनगुटकर यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, युवा सेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, माजी नगरसेवक अमोल गोयथळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment