रामभाऊ बेंडल साहेबांच्या विचारांचा वारसा आंम्ही पुढे चालवू - राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष (अजित पवार गट) साहिल आरेकर
लोकनेते,स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेबांना मी प्रत्यक्षात पाहिले नसले तरी त्याचे सामाजिक आणि राजकीय कार्य उल्लेखनीय आहे. लोकनेते,आमदार,स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेबांच्या लोकोपयोगी विचारांचा वारसा आंम्ही पुढे चालवू असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी व्यक्त केले. गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचे उद्धारकर्ते, लोकनेते,माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि आदरांजली सभा शृंगारतळी येथे गुहागर बाजार येथील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ , शाखा तालुका गुहागर ग्रामीण या शाखेचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलीत करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी लोकनेते,स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांना अभिवादन करताना माझे आजोबा कै. सदाशेठ आरेकर, लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब आणि माजी आमदार डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या कार्याचा गौरव करताना या तालुक्यातील दिग्गज व्यक्ती आपल्यामधून निघून गेल्या आहेत. आज जरी पक्ष वेगळे असले तरी राजेशजी बेंडल साहेब आपली विचार धारा एक आहे. राजेशजी बेंडल साहेब यांच्या पाठीशी आंम्ही ठामपणे उभे आहेत. २०२९ मध्ये गुहागर तालुक्याचा आमदार आंम्हाला राजेशजी बेंडल साहेबांच्या रुपाने पहायचा आहे असे स्पष्ट मत साहिल आरेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी विचारपिठावर अध्यक्षस्थानी पांडुरंग पाते, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल,ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते,माजी अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी,मुंबई शाखेचे सरचिटणीस कृष्णाजी वणे,ग्रामीण शाखेचे सरचिटणीस प्रदिप बेंडल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर, मुस्लिम समाजाचे महामुद कादीर बारमारे गुरुजी, महेश कातकर, माजी सभापती विलास वाघे,महादेव साटले, युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश मते, अनंत पागडे, शंकर मोरे, गिरीश बारस्कर आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज संघटनेचे तालुका सचिव प्रदिप बेंडल यांनी केले.
Comments
Post a Comment