खोडदे गोणबरे वाडी येथील माधवी रामचंद्र गोणबरे हिचा आम. भास्करशेठ जाधव यांनी केला गौरव
जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारत देशासाठी अनेक सुवर्ण पदके पटकावणारी मुंबई अंधेरी येथे सद्या वास्तव्यास असलेली व पंचायत समितीचे माजी सदस्य रविंद्र आंबेकर यांची भाची आणि गुहागर तालुक्यातील खोडदे गोणबरे वाडीची सुकन्या कु. माधवी रामचंद्र गोणबरे हिने जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत आतापर्यंत सन २०१७ मध्ये सुवर्ण पदक, २०१८ मध्ये सुवर्ण पदक, २०१९ मध्ये रौप्य पदक, २०२२ मध्ये सुवर्ण पदक, २०२३ मध्ये रौप्य पदक आणि २०२४ मध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत. या तिच्या चमकदार कामगिरीची दखल घेऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षातर्फे गुहागर विधानसभा मतदारसंघ मर्यादित मुंबई विरार येथील सखुबाई भास्कर मंगल कार्यालय मनवेलपाडा विरार पूर्व येथे लोकनेते भास्कर जाधव गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.यावेळी देशासाठी खेळणारी गुहागर तालुक्यातील खोडदे गोणबरे वाडी येथील कु. माधवी रामचंद्र गोणबरे हिचा आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते जाहीर सत्कार करुन गौरव करण्यात आला.यावेळी विचारपिठावर आमदार भास्करशेठ जाधव यांच्या समवेत शिवविद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीचे विजय कदम, आय. बी. एस. सी. अकॅडमीचे संचालक आणि उपनेते प्रशांत राणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज देशमुख, विरार शहर प्रमुख उदय जाधव आदी. मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment