गरीब,गरजू विद्यार्थांसाठी कै.शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्टतर्फे पाटपन्हाळे विद्यालयात वह्या वाटप

कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्टतर्फे गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील गरीब , गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुमारे ३० डझन वह्या वाटप करून नुकताच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. सदरच्या शैक्षणिक वस्तू वितरण कार्यक्रमासाठी कोकण कट्टा मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे तसेच रत्नागिरी जिल्हा कोकण कट्टाचे संपर्कप्रमुख सुमंत भिडे यांचे विशेष सहकार्य लाभले. 
   पाटपन्हाळे विद्यालयात वह्या वाटप समारंभासाठी मुख्याध्यापिका सौ.एस.एस. चव्हाण , जेष्ठ प्रा.एस.एस.मोरे , ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस.एस. सुतार , सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.वाय.भिडे , शिक्षक आर.एम. तोडकरी , एस.बी.मेटकरी , एस.एम.आंबेकर , के.डी.शिवणकर , एस.एस.घाणेकर , एस.शिर्के आदी मान्यवर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापिका व शिक्षकवृंदांच्या हस्ते पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील गरीब , होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या. मुख्याध्यापिका सौ.एस.एस. चव्हाण यांनी कै.शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्ट तसेच कोकण कट्टा मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले. गरजू , होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी धन्यवाद दिले .

Comments