शुक्ला मॅडम आम्ही पत्ते सांगतो...तुम्ही कारवाईची हिम्मत ठेवा ..ईथेच ड्रग्स चा उगम होतो
---------
● *मटका जुगार धंद्यात मुंबई पोलीसांना सोयीस्कर अंधत्व!*
● कळवा (प.) ठाण्यातील जुगाराचा सर्वात मोठा अड्डा!; दररोज लाखोंची तर महिन्याला करोडोंची उलाढाल
-------
विशेष प्रतिनिधी, मुंबई
लाखो घरे उध्वस्त करणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या जुगार-मटक्याविरुद्ध ‘दै. मुंबई मित्र’ ने समाज हितासाठी मोहीम उघडली आहे. मुंबई ठाण्यात जुगार मटक्यांच्या अड्ड्यांचे पेव फुटले असून, दिवसेंगणिक ह्या अंड्याची संख्या वाढतच चांगली आहे. सर्वसामान्य व किरकोळ वाटणाऱ्या या जुगार मटक्यांच्या अड्ड्यांवरून दिवसाला लाखो कोटी रुपयाची उलाढाल होत असते. हे पोलीस प्रशासनाला कळत नाही तर सर्वसामान्यांना काय कळणार? ‘दै. मुंबई मित्र’मुंबई ठाण्यातील काही जुगार मटका-अड्ड्यांची आणखी काही नावे प्रसिद्ध करत आहे.
यापैकी ठाण्यातील कळवा येथील एका जागा मालकाने जुगार मटक्यांचे अड्डे चालवण्यासाठी आपली जागा दिली असून, या जागेचे रोजचे भाडे सुमारे एक लाख त्याला मिळते. रोजचे भाडे एक लाख जर मटका जुगार चालवणारे देत असतील तर त्यांची दिवसाची किती कमाई असेल याचा विचारच करता येत नाही.
----
*खार-पूर्व, जवाहर नगर*
मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात खार (पूर्व) येथील गोळीबार रोडवर जवाहर नगर मध्ये शारदा बार समोरच्या गल्लीमध्ये रोशन दुकानासमोर मटक्याचा मोठा अड्डा चालतो. मात्र या ठिकाणी केवळ मटक्याचे आकडे नोंदवून घेतले जातात. या मटक्याचा मालक शेट्टी असून मॅनेजर पिंटू नामक इसम आहे.
*ठाणे-लोकमान्य नगर*
ठाणे पोलिसांच्या हद्दीमध्ये ठाणे (पश्चिम) येथील लोकमान्य नगर परिसरात दुर्गा छाया बारच्या बाजूला रूप मिलन स्टोअरच्या मागे जुगार-मटक्याचा अड्डा मोठ्या प्रमाणात चालतो.
*ठाणे-शास्त्रीनगर सर्कल*
ठाणे (पश्चिम) येथील शास्त्रीनगर सर्कल समोरील झोपडपट्टीत मटन शॉप च्या मागे मटका-जुगाराचा अड्डा आहे. या अड्ड्याचा मालक सरदार असून हा अड्डा आनंद बंगेरा, अतुल कामत हे चालवतात. या अड्ड्यावर पताडा, रनिंग आणि पेटी बाजार हे गेम चालतात.
*मुंब्रा कौसागाव*
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंब्रा (पश्चिम) येथील कौसा गावामध्ये हनुमान मंदिरा शेजारी जुगार मटक्याचा अड्डा आहे. या अड्ड्याचा मालक पंकज नावाचा इसम असून या अड्ड्यावर रनिंग, पाताडा, सोरट, चक्री आणि मटका हे गेम चालतात.
===
*कळवा (प.) ठाण्यातील जुगाराचा सर्वात मोठा अड्डा!; दररोज लाखोंची तर महिन्याला करोडोंची उलाढाल*
ठाणे शहर पोलिसांच्या हद्दीमधील कळवा (पश्चिम) येथे सर्वात मोठा जुगार अड्डा चालतो कळवा पश्चिम येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवर नॅशनल बार च्या पाठीमागे पांडुरंग लीला इमारतीच्या तळमजल्यावर पत्त्यांचा जुगार चालतो. हा अड्डा शेखर आण्णा नावाचा इसम चालवतो याच ठिकाणी आणखी एक जुगार अड्डा चालतो. हा अड्डा रामूशेठ नामक इसम चालवतो. येथे नॉकआउट जुगार चालत असून, प्रत्येक डाव पाच ते सहा हजार रुपयांचा असतो.
त्याचबरोबर या जागेत दोन मटक्याचे अड्डे आहेत. यापैकी एक मटका एस.पी. नावाचा इसम चालवतो. त्याच्या अड्ड्यावर मिलन बाजार आणि जनता बाजार या नावाने मटका घेतला जातो. दुसरा मटक्याचा अड्डा आनंद बंगेरा हा इसम चालवतो. त्याच्या अड्ड्यावर साईड बाजार नावाचा मटका खेळला जातो.
वरील दोन पत्त्यांचे आणि दोन मडक्यांचे अड्डे ज्या जागेत आहेत त्या जागेचा मालक रमेश तांडेल नामक इसम आहे. तो या चारही अड्डा चालकांकडून प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने भाडे घेतो शेखर अण्णाच्या पत्त्याच्या अड्ड्याचे दिवसाचे भाडे 60 हजार रुपये आहे. तर रामूशेठच्या क्लबचे भाडे दिवसाला 15 हजार रुपये आहे. एस.पी. मटक्यावाल्याकडून 15 हजार तर आनंद भंगेराकडून दर दिवशी 15 हजार रुपये भाडे जागा मालक रमेश तांडेल गोळा करतो. याचा अर्थ रमेश तांडेलला आपल्या जागेचे भाडे दिवसाला एक लाखभर रुपये मिळते. म्हणजेच महिन्याचे 30 लाख आणि वर्षाचे सुमारे सव्वा तीन कोटी रुपये भाडे मिळते. जर जुगार मटका चालवणारे एवढे भाडे दिवसाला जागा मालकाला देत असतील तर त्यांची दिवसाची कमाई किती असेल? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ शेखर अण्णाच्या पत्त्याच्या जुगाराचा दिवसाचा धंदा सुमारे 20 लाख रुपये आहे.
आता निदान वरील अड्ड्यांवरून अंदाज आला असेल की छोट्याशा व निरुपद्रवी वाटणाऱ्या गल्लीबोळातील जुगार मटक्यांच्या अड्ड्यावर किती कमाई होत असेल? एखाद्या कॉर्पोरेट कंपनीची ही वार्षिक उलाढाल एवढी नसेल तेवढी या अड्ड्यांवरून होते. आशा आहे की, पोलीस प्रशासनाचे आता तरी डोळे उघडतील. आणि ते या जुगार मटक्याच्या अड्ड्यांवर कारवाई करतील.
#CrimeHub #IllegalGambling #PoliceBlindEye #MumbaiMatka #ThaneCrime #MatkaNexus #GamblingDen #ShutMatka #ExposeGamblers #CroresInCrime #BettingRacket #ActionNeeded #WakeUpPolice #DevendraFadnavis #ThanePolice #MumbaiPolice #
Comments
Post a Comment