शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयामध्ये शास्त्रीय पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न

चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय,खरवते-दहिवली येथे महाविद्यालयामधील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून प्रक्षेत्रावर शास्त्रीय पद्धत वापरून भात लागवड करण्यात आली.कोकणातील भात हे प्रमुख पिक होय.या पिकाची लागवड,खत व्यवस्थापन,कीड व रोग नियंत्रण,काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान यावर महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास व्हावा तसेच राज्यातील विविध भागातुन शिक्षणासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांना भात पिकाची ओळख व्हावी हा प्रमुख उद्देश ठेवुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.यावेळी चार सुत्री लागवड,गिरीपुष्प वापराचे फायदे तसेच डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली यांचे कडुन निर्मिती करण्यात आलेल्या सुधारित जाती आदी.वर विषय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी विभाग प्रमुख डाॅ.हरिश्चंद्र भागडे,विषयतज्ज्ञ डाॅ.उमेश ठाकरे,प्रा.संग्राम ढेरे,प्रा.प्रणय ढेरे ,कृषि सहाय्यक राजेंद्र कोळपे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments