निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे कृषी तज्ञ व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिन उत्साहात साजरा

कृषी तज्ञ व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जयंती महोत्सव आणि कृषी दिन गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित रिगल कॉलेज शृंगारतळी,डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते - दहिवली तालुका चिपळूण आणि निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने कृषी तज्ञ आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जयंती महोत्सव आणि कृषी दिन निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाला. 
                           यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पा कदम, रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राध्यापीका सोनल मिरगल, सोनाली पाटील वृणाल बेर्डे, विक्रम खैर,दत्ताराम कदम,पाणलोट कमीटी सचिव नितेश पांचाळ आदी. मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्वलीत करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर निर्मल ग्रामपंचायत आबलोली तर्फे राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत रमेश शंकर पांचाळ,श्रीमती.निर्मला जानू कदम, लक्ष्मण भागोजी बोडेकर, यम्या बाब्या खरात, सावित्री यम्या खरात,प्रभावती बाळू पालशेतकर यांना तर एडीआयपी अंतर्गत दिव्यांग लाभार्थी उज्वला उदय शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. 
                              यावेळी ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी,रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राध्यापीका सोनाली मिरगल,शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवलीचे कृषी दुत वैभव गायकवाड, सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांनी मौलिक मार्गदर्शन केले त्यानंतर आबलोली गावात रिगल कॉलेज शृंगारतळीच्या ४० विद्यार्थांनी राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.कॅम्प) मधून एकदिवसीय स्वच्छता अभियान अंतर्गत आबलोली गावात स्वच्छता केली. यावेळी सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी,तंटामुक्ती समीती अध्यक्ष आप्पा कदम, ग्रामपंचायत सदस्य ऋषीकेश बाईत, संजय कदम, सौ. रुपाली कदम, रिगल कॉलेजच्या प्राध्यापिका सोनाली मिरगल, सोनाली पाटील, वृणाल बेर्डे, विक्रम खैर, दत्ताराम कदम,पाणलोट कमीटीचे सचिव नितेश पांचाळ, मुख्याध्यापिका सौ. ममता जाधव,अंगणवाडी सेविका प्रिया कदम, आशा स्वयंसेविका विशाखा कदम,सानिद्या रेपाळ,आबलोली पोष्ट ऑफिसचे पोष्ट मास्तर नित्यानंद कुळ्ये, कोतवाल प्रकाश बोडेकर, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते - दहिवलीचे कृषी दुत रुपेश जाधव,अजित घोगरे, ओम चिखले, निखिल गडगे,मेघराज मिंड,वैभव गायकवाड,ओंकार बिबे, यांचेसह रिगल कॉलेजचे ४० विद्यार्थी व आबलोली गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments