उदय सामंत यांनी माझ्या बद्दल सदभावना व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे-आम.भास्कर जाधव

गेले दोन तिन दिवस आम. भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. भास्कर जाधव राजकारणातून निवृत्त होणार ते नाराज आहेत अशी चर्चा ऐकायला येत होती.त्यानंतर संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आमदार भास्कर जाधव यांना असा सल्ला दिला की आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ नये.

त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार उदयजी सामंत साहेब यांनी सुद्धा जाधव यांनी बाजूला होऊ नये अशी त्यांच्याबद्दल सदभावना व्यक्त केली होती. 

त्यानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत असे सांगितले की नामदार उदय सामंत यांचा मी आभारी आहे त्यांनी माझ्या बद्दल जी सदभावना व्यक्त केली त्याबद्दल. मात्र मी निवडणुकी मध्ये माझ्या मतदारसंघांमध्ये पोलिसांच्या गाडीतून उदय सामंत यांनी पैसे आणले असं मी त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं नाही. मी नाव त्यांच घेतलं नाही.

पोलिसांच्या गाडीतून माझ्या मतदारसंघांमध्ये पैसे वाटले गेले या मतावर मी आजहि ठाम आहे .मात्र ते पैसे उदय सामंत यांनी वाटले असे मी कुठेही बोललो नाही. असे स्पष्ट मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.

Comments