आबलोली येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान" उत्साहात संपन्न
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील खालील पागडेवाडी येथील सभागृहात महसूल विभाग तहसीलदार कार्यालय गुहागर मंडळ स्तरावरील "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये आबलोली पंचक्रोशीतील आबलोली, शीर, मासू, खोडदे, पाचेरी आगर, पाचेरी सडा, भातगाव, शिवणे, कुडली, जांभारी, आवरे, असोरे, काजुर्ली अशा एकुण २५ गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि शेतकरी बंधू - भगीनी बहुसंख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन, दीपप्रज्वलीत करुन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि महसूल बाबत मौलिक माहिती आबलोलीचे ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही जोशी यांनी दिली त्यानंतर ॲग्रीस्टॅक योजनेची मौलिक माहिती कुडलीचे ग्राम महसूल अधिकारी एस. एस. पिटले यांनी दिली.त्यानंतर शिवणे येथील ग्राम महसूल अधिकारी एस. पी. जाधव यांनी ई पीक पाहणी याविषयी मौलिक माहिती दिली. त्याचेनंतर भातगाव येथील ग्राम महसूल अधिकारी ए. बी. बरकडे यांनी सलोखा योजनेची मौलिक माहिती दिली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्पन्न दाखले,नॉन क्रिमिलेअर दाखले, वय अधिवास दाखले, ७/१२ , ८ अ, फेरफार, डिजिटल हयात दाखले वितरित करण्यात आले.
यावेळी विचारपिठावर आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, खोडदे गावच्या सरपंच कु. पुजा विलास गुरव, सडे जांभारी गावच्या सरपंच श्रीमती. वनिता डिंगणकर, माजी सरपंच प्रमोद गोणबरे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम,गावकर अनंत पागडे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पागडे, श्रीमती. शालिनी शितप, माजी सरपंच ॲड. प्रमेय आर्यमाने, नरेश निमूणकर, आबलोलीचे पोलीस पाटील महेश भाटकर, शीर चे पोलीस पाटील संदिप घाणेकर आदी. मान्यवर उपस्थित होते. शेवटी आबलोलीचे ग्राम महसूल अधिकारी व्ही व्ही. जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments
Post a Comment