हजारो फेरीवाल्यांचा एकजूटीनं उठाव आझाद मैदान आंदोलन यशस्वी!
हजारो फेरीवाल्यांचा एकजूटीनं उठाव आझाद मैदान आंदोलन यशस्वी!
मुंबईसारख्या महानगरात गेली २०-३०-५० वर्षे प्रामाणिकपणे आपला रोजगार उभा करणाऱ्या लाखो फेरीवाल्यांवर मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून अन्यायकारक पद्धतीने कारवाई सुरू आहे. या कारवाईत जुने फेरीवाले हटवले जात आहेत व गेल्या अनेक दशकांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवून बेघर करण्याचा प्रयत्न होतोय. हजारो फेरीवाल्यांचा सरकारच्या कर्ज-सबसिडीशिवाय व्यवसाय चालवला जातो तसेच यामार्फत असंख्य तरुणांना रोजगार देखील उपलब्ध होतो.
या पाश्वभूमीवर आज मंगळवार, दिनांक १५ जुलै २०२५ रोजी भर पावसात आझाद मैदान, मुंबई येथे फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी भव्य आणि ऐतिहासिक आंदोलन संपन्न झाले. मुंबई महानगरातील विविध परिसरांमधून दादर, घाटकोपर, ठाणे, बोरिवली, पालघर, सफाळा आदी भागांतून आलेले २५,००० पेक्षा अधिक फेरीवाले महिला, पुरुष, वृद्ध आणि तरुणाई एकजुटीने न्याय हवकांसाठी सहभागी झाले.
ही केवळ उपेक्षेच्या विरोधातली गर्जना नव्हती, तर हक्कांसाठीचा आवाज होता. ही होती रोजीरोटीच्या अधिकारासाठीची चळवळ. या आंदोलनाचे यशस्वी आयोजन संयुक्त फेरीवाला महासंघ आणि पुढील प्रमुख कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून शक्य झाले. दया शंकर सिंग, बाबुभाई भवानजी, संजय यादवराव, सलमा शेख, शिवाजी सुळे, संजय आंबेरकर, महेश कानडे, राजेश महाडिक, राजेश सिंग, जितेंद्र कांबळे, जितू गुप्ता, संजय खांडे, गजानन आवळे, महेश गुप्ता, प्रतीक शिंदे, बाळा कारंडे, संतोष लोहकरे, राजश्री यादवराव, अनंत रिंगे, योगेश रिंगे, अशोक यादव, राकेश गुप्ता, सुनिता गुडेकर, रजनी साव, आशा पाटील यांचा सहभाग उल्लेखनीय आणि प्रेरणादायी ठरला.
सरकारकडून तात्काळ हालचाल ः-
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. श्री. उदय सामंत साहेब यांनी आझाद मैदानावर प्रत्यक्ष येऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी सरकारकडून उद्याच्या २४ तासात म्हणजेच १६ जुलै २०२५ रोजी, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे वरिष्ठ पोलीस आयुवत, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या समवेत फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली जाईल असे आश्वासन उपस्थित सर्व फेरीवाले यांना दिले. भविष्यामध्ये फेरीवाल्यावर अन्याय होणार नाही. शासन तुमचा सोबत राहील असा शब्द दिला. तसेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मा. श्री. शंभूराज देसाई साहेब यांची विधान भवनात फेरीवाला शिष्टमंडळ यांनी सदिच्छा भेट घेऊन फेरीवाल्यांच्या अडचणी, समस्यांवर उपाय व ह्वकाच्या मागण्यांबाबत सविस्तर निवेदन त्यांना सादर केले. मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत फेरीवाल्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनाने दाखवून दिले की सामान्यांचा आवाज एकवटला, तर कोणतीही व्यवस्था दुर्लक्ष करू शकत नाही. हा लढा अजून संपलेला नाही पण आज ह्या ऐतिहासिक एकजुटीने आम्हाला दिला आहे नवा आत्मविश्वास आणि नवी दिशा. फेरीवाल्यांवरील अन्याय थांबला नाही, तर पुन्हा तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
बाबुभाई भवानजी, माजी उपमहापौर, मुंबई महा., समन्वयक
संजय यादवराव, समन्वयक
संयोजक संयुक्त फेरीवाला महासंघ, मुंबई
९८१९३३६७६८ / ८०९७६७७६३५ / ९८९२६४७३२१ / ९८३३२७५६३८
Comments
Post a Comment