जि. प. केंद्र शाळा पाचेरी आगर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील कृषी दुतांचा स्तुत्य उपक्रम

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते - दहिवली, तालुका चिपळूण या कृषी महाविद्यालयातील कृषी दुतांमार्फत गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा पाचेरी आगर येथे ग्रामिण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कृषी दिनाचे औचित्य साधुन वृक्षदिंडी, वृक्षारोपण तसेच वकृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्षी हुमणे या होत्या. यावेळी सपना हुमणे, मुख्याध्यापक ऋषिकांत पवार, उपशिक्षिका पल्लवी पवार, शिवाजी साळवे, विठ्ठल हांडे, ग्रामपंचायत अधिकारी विश्वनाथ पावरा, कृषी दुत नितिन पाटील, अम्मार चिकटे, कार्तिक गवई, हाजिम अमल, मोहम्मद बिलाल, उमैर मणियार यांचेसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी कृषी दुत नितिन पाटील यांनी कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणाविषयी मौलिक मार्गदर्शन केले.

Comments