24 तासाच्या आत गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करून अवघ्या 23 दिवसांमध्ये सुनावणी होऊन गुन्हा दोष सिद्ध
24 तासाच्या आत गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करून अवघ्या 23 दिवसांमध्ये सुनावणी होऊन गुन्हा दोष सिद्ध
सावर्डे गुळेकर वाडी येथील फिर्यादी अंगणातील कचरा काढत असताना आरोपीने तिथे मद्यपान करून शिवीगाळ केल्याची घटना घडली होती
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वरील प्रमाणे दि. 19/06/2025 रोजी 13.35 वा. गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दि.11/07/2025 रोजी केसचा निकाल लावून आरोपीस शिक्षा सुनावली आहे
रत्नागिरी प्रतिनिधी:-
सावर्डे पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 58/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 79 हा गुन्हा दिनांक 19/06/2025 रोजी 11.00 वा. चे सुमारास सावर्डे पोलीस ठाणे कार्य क्षेत्रामध्ये गुळेकरवाडी येथे घडलेला असून गुन्ह्यातील फिर्यादी ही तिचे घराचे अंगणातील कचरा काढत असताना आरोपी सचिन मारुती गुळेकर याने मद्य पिऊन येऊन फिर्यादीच्या समोर उभा राहून मद्याच्या नशेत फिर्यादिस अश्लील शिवीगाळी केल्याने फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न झाल्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन वरील प्रमाणे दि. 19/06/2025 रोजी 13.35 वा. गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दि.11/07/2025 रोजी केसचा निकाल लावून त्यास शिक्षा सुनावली आहे.
नमूद गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये आरोपीत सचिन मारुती गुळेकर, वय 35 वर्षे रा. सावर्डे, गुळेकरवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी याने गुन्हा केल्याचे कबूल केले. नमूद गुन्ह्याचा तपास पी.एल. चव्हाण, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सोबत आर.पी. मेश्राम, म.पो. हेड कॉ/933 सावर्डे पोलीस ठाणे यांनी जलदगतीने करून आरोपीत सचिन मारुती गुळेकर याचे विरुद्ध सबळ पुराव्यानिशी 24 तासांच्या आत मा. न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांचे कोर्टात दोषरोपपत्र दाखल केले. तसेच नमूद गुन्ह्यातील पिडीत महिला असून आरोपीने महिला संदर्भातील गंभीर स्वरूपातील गुन्हा केलेला असल्याने सदर केसचा लवकरात लवकर न्यायनिवाडा होऊन पिडीत महिलेस न्याय मिळून देणेकरीता सदर केस 'फास्ट ट्रॅकवर" चालविणेबाबत मा. न्यायालयास विनंती रिपोर्ट सादर करण्यात आला. तसेच गुन्ह्यातील 05 साक्षीदार यांना गुन्ह्याचे घटनेसंदर्भात अवगत करून केसचे सुनावणीकामी वेळीच मा. कोर्टात हजर ठेवण्यात आले. मा. न्यायालयाने केस फास्टट्रॅकवर चालवून आरोपी विरुद्ध गुन्ह्यात सबळ पुरावा निष्पन्न झाल्याने मा. न्यायदंडाधिकाटी वर्ग । न्यायालयाने आटोपीस गुन्ह्यामध्ये आज दि. 11/07/2025 टोजी दोषसिद्ध ठरवून पुढील प्रमाणे शिक्षा सुनावलेली आहे.
1) बी.एन.एस कलम 79 अन्वये 1 महिना साधा कारावास व 1000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैद,
2) बी.एन.एस कलम 352 अन्वये 1 महिना साधा कारावास व 1000/- रूपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैद,
3) बी. एन. एस. 296 अन्वये 1 महिना साधा कारावास व 1000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैद
तरी सदर गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाले पासून 24 तासाच्या आत मा. न्यायालयात सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर करून केस "फास्टट्रॅकवर" चालवून अवघ्या 23 दिवसांमध्ये गुन्हा दोषसिद्ध झालेला आहे. यामध्ये मा. श्री. केदार पोवार, न्यायदंडाधिकारी वर्ग । चिपळूण यांनी आरोपीस शिक्षा सुनावलेली असून सरकारी वकील श्रीम. तृष्णा तानसेन तळेकर यांनी केसचे प्रॉसिक्यूशनचे काम पाहिलेले आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, श्री. नितिन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. राजेंद्रकुमार राजमाने, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, श्री. आबासो पाटील, सावर्डे पोलीस ठाणे, श्रेणी-पोउपनी/श्री. चव्हाण, पोहेकॉ/672 बी. एस. कोळेकर, मपोहेकॉ/933 आर.पी. मेश्राम, पोहेकों / 955 एम. एम. कांबळे यांनी केलेली आहे. यामध्ये सरकारी वकील श्रीम. तृष्णा तानसेन तळेकर यांनी केसचे प्रॉसिक्यूशनचे काम पाहिलेले आहे.
Comments
Post a Comment