प्रथमेश रायकर यांची मनसेच्या विद्यार्थी सेना गुहागर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

आबलोली 
 गुहागर तालुका लिंगायत समाजातील एक धडाडीचे कार्यकर्ते प्रथमेश रायकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गुहागर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशाने उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वाढदिवसादिनी प्रथमेश रायकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
                   असगोली येथील प्रथमेश रायकर एक युवा कार्यकर्ते म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रथमेश रायकर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करत आपला व्यवसाय सांभाळत त्यांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविला आहे. कबड्डीमध्ये लिंगायत समाज गुहागरकडून खेळताना अनेक वेळा त्याने गौरवास्पद कामगिरी केली आहे.
                  प्रथमेश रायकर यांचे तालुक्यातील सर्वच समाजातील तरुण मुलांशी सलोख्याचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने मनसेकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र देताना मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की पक्षाचे एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत यावेळी मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी,राहुल जाधव, सुनिल मुकनाक,आदी उपस्थित होते. प्रथमेश रायकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे गुहागर तालुक्यामधून सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Comments