परचुरी बौद्धवाडी अंतर्गत रस्त्याचे उदघाटन उत्साहात संपन्न

आबलोली 
गुहागर तालुक्यातील परचुरी बौद्धवाडी येथील जिल्हा परिषद सेस अनुदानातून मंजूर झालेल्या वाडी अंतर्गत रस्त्याचे उदघाटन परचुरी गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका उपाध्यक्ष व सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष , बौद्धजन सहकारी संघाचे माजी पदाधिकारी विलास गमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला गावच्या सरपंच प्रतीक्षा भुवड, प्रतिष्ठित नागरिक व कांदळवन समितीचे अध्यक्ष अब्रार भाई चौगले,ग्रामपंचायत सदस्य अविनाश गमरे, संदीप डाफळे, सुविधा भुवड, रसिका भुवड, अपेक्षा पवार, अंजली डाफळे, संतोष पवार, बौद्धवाडीचे अध्यक्ष शंकर गमरे, सुदाम गमरे, मनोहर गमरे, योगेश गमरे,संतोष गमरे, अनंत गमरे, मनीष गमरे, निलेश गमरे, निखिल गमरे, घनश्याम गमरे, जयंत गमरे,महिला मंडळ अध्यक्ष सविता गमरे, श्वेता गमरे, मीनाक्षी गमरे,ज्योती गमरे, अमिता गमरे,डाफळेवाडी अध्यक्ष रामचंद्र डाफळे, गुरववाडी अध्यक्ष कृष्णा महाडिक, फणसवाडी अध्यक्ष गणेश भुवड, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुपे , ग्रामपंचायत कर्मचारी संजय भुवड, आतेश गमरे व श्रद्धा सोलकर यांच्या सह गावातील सर्वच वाड्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक १७ चे स्थानिक ग्रामस्थ व मुंबईकर यांनी विशेष सहकार्य केले.

Comments