शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.आदित्य महेंद्र मोहीते याची कोकण रेल्वे मध्ये स्टेशन मास्टरपदी निवड
आबलोली
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय,खरवते-दहिवली येथील माजी विद्यार्थी कु. आदित्य महेंद्र मोहीते याची भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणा-या कोकण रेल्वे मध्ये स्टेशन मास्टर या पदावर नुकतीच निवड झाली.केंद्र शासनाच्या माध्यमातूनसन २०२४ यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तसेच या पदासाठी घेण्यात येणा-या विविध निकषांमध्ये कु.आदित्य महेंद्र मोहीते याने उज्वल यश संपादन केले.या यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम यांनी कु. आदित्य मोहिते याचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत तसेच महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी कु.आदित्य याचा सत्कार करत त्याचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या वेळी महाविद्यालयाचे कृषि विभाग प्रमुख डाॅ.हरिश्चंद्र भागडे, आदित्यचे आई वडील व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment