मासू नं.१ शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम हि उत्साहात संपन्न

आबलोली  
 जि.प.पूर्ण प्राथ.आदर्श शाळा मासू नं.१ या शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नवागत विद्यार्थांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले . यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते मासू गावचे भूषण श्री. राजेशजी मासवकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते दरवर्षी मोफत वह्या वाटप केले जाते.यावर्षी त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहीत्य वाटप केले.शाळेसाठी स्टेशनरी व शिक्षकांसाठी छत्री, स्वयंपाकी, मदतनीस यांनाही छत्री दिली. मासू गावचे सुपुत्र राजेश भोजने यांनी यावर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले.मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले . सा.फु.द.पा.योजनेअंतर्गत सौ. मृणाली महेंद्र रेडेकर,माजी मुख्याध्यापिका यांचेकडून रू.३०००/- शाळेला देणगी देण्यात आली.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय मसुरकर, पांडुरंग नाचरे, सिमरन नाचरे, मंगेश मास्कर, संजिवनी नाचरे,आरोही मास्कर, मोहीनी आलीम, महादेव आलीम, वसंत आलीम, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी मुख्याध्यापक श्री.रविंद्र कुळये उपस्थित होते. शाळेमार्फत शैक्षणिक साहित्य देणगी दारांचे व रोख रक्कम देणगी दारांचे आभार मानण्यात आले.

Comments