श्री.संत सद्गुरु बाळूमामा पोलीस करियर अकॅडमी तर्फे गुहागर तालुक्यात प्रथमच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु

आबलोली
श्री. संत सद्गुरू बाळूमामा पोलीस करियर अकॅडमी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले असून या प्रशिक्षण केंद्राचा उदघाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत 
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या पाठीमागे गुहागर तालुका कुंभार समाज भवन येथे उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. 
                       या उदघाटन सोहळ्याला चिपळूणचे डिफेन्स आर्मी मॅन मंदार चव्हाण, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक शामराव कांबळे, महाराष्ट्र सुरक्षा बल एएसओ बारगुडे, गुहागर तालुका कुंभार समाज अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, ॲड. प्रमेय आर्यमाने, युवा नेते उमेश खैर आदी. मान्यवर उपस्थित होते. 
                  या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस भरती इच्छुक उमेदवारांनी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपलं ॲडमिशन लवकरात लवकर करून घ्यावे यासाठी ग्रामीण भागातील युवक युवतींनी जास्तीत जास्त प्रशासन सेवेत यावेत यासाठी आंम्ही प्रयत्नशिल आहोत. तरी आगाऊ येऊ घातलेल्या १०,००० अधिक पोलीस भरतीसाठी आपण इच्छुक उमेदवारांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे विनंती वजा जाहिर आवाहन श्री. संत सद्गुरू बाळूमामा पोलीस करियर अकॅडमीचे मार्गदर्शक तन्मय दिनेश देवरुखकर मो. नं. ८४४६९९९०३३,
७८७५३९७९५१ यांनी केले आहे.

Comments