गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे हॉटेल व्यावसायिक, बिर्यांनीसेंटर,चायनिज सेंटर येथे अन्न भेसळच्या अधिका-यांनी लक्ष न दिल्यास मनसे आक्रमक भूमिका घेणार - उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर
गुहागर-प्रतिनीधी
गुहागर तालुक्यातील तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी येथील बाजार पेठेत हॉटेल व्यावसायिक, बिर्याणी सेंटर, चायनिज सेंटर, पाणीपुरी, भेळपुरी सेंटर येथे काही ठिकाणी छोटे - छोटे सिलेंडर वापरण्यात येतात .अनधिकृत गॅस सिलेंडर कोण पुरवते.स्वयंपाकाला पाणी कोणते वापरले जाते. सांडपाण्याचा निचरा कुठे केला जातो. स्वच्छता गृह आहे का? बाल कामगार काम का करतात? , स्वच्छता असते का? यासर्व बाबींकड अन्न भेसळचे अधिकारी का दुर्लक्ष करतात? व्यावसायिक आणि अधिकारी यांचे साटे लोटे आहे का? व्यावसायिक ग्राहकांशी उर्मटपणे वागतात का? आणि बालकामगारांना कामासाठी खपवून घेतले जाते का? या सर्व प्रकरणाची चौकशी करून असे जे व्यावसायिक आहेत त्यांचेवर अन्न भेसळच्या अधिका-यांनी योग्य ती कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.
Comments
Post a Comment