जानवळे (जानवळकरवाडी) येथील श्री साई मंदिराचा २७ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा
आबलोली
गुहागर तालुक्यातील जानवळे (जानवळकरवाडी) येथील श्री. साई मंदिराचा २७ वा वर्धापन दिन नुकताच विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी
श्री साई मुर्तीचा विधिवत अभिषेक करण्यात आले. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात होमहवन करण्यात त्यानंतर श्री. सत्यनारायण महापुजा, तीर्थप्रसाद आरती, गुहागर तालुक्यातील जानवळे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कमलाकर वणगे महाराज यांचे हरिपाठ व किर्तन कार्यक्रम पार पडला,दुपारी साई भंडारा (महाप्रसाद) याचा लाभ तालुक्यातील साई भक्तांनी घेतला.रात्रौ महाआरती, श्री दत्तगुरु दर्शन मंडळ जानवळे मधलीवाडी यांचे भजन संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी शृंगारतळी ज्येष्ठ उद्योजक अरुणशेठ गांधी , निखिल गांधी व कुटुंबीय, सचिन उर्फ गुंडा मराठे, हॉटेल हेमत मालक ओंकार संसारे, अनिल कोंडविलकर, विनोद जानवळकर, राजन जानवळकर, संदेश जानवळकर, समीर जानवळकर, विशाल जानवळकर , सुधीर जानवळकर व कुटुंबीय उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व साई भक्तांनी विशेष मेहनत घेतली .
Comments
Post a Comment