सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे सह संपर्क अध्यक्ष समिर जोयशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या पक्षाचे सह संपर्क अध्यक्ष समिर जोयशी यांचा वाढदिवस शृंगारतळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या संपर्क कार्यालयात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर यांच्यासह मनसेच्या पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन, दीपप्रज्वलीत करुन महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन कौंढर काळसूर गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे सह संपर्क अध्यक्ष समिर जोयशी यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या व महाराष्ट्र सैनिक यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मनसेचे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, तालुका सचिव प्रशांत साठले, तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर आदींनी मौलिक मार्गदर्शन करुन समिर जोयशी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर,उप तालुका अध्यक्ष अमित खांडेकर,तालुका सचिव प्रशांत साठले, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहूल जाधव , जितेंद्र साळवी, दत्ताराम गिजे, विजय शिंदे, कौंढर काळसूरचे शाखा अध्यक्ष सुनिल मुकनाक,पाटपन्हाळेचे शाखा अध्यक्ष सुयोग कुंभेटे,निलेश गमरे आदी. महाराष्ट्र सैनिक उपस्थितीत होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहूल जाधव यांनी केले.
Comments
Post a Comment