अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ तालुका गुहागर या भजन मंडळाची कार्यकारणी जाहिरअध्यक्षपदी सागर मोरे तर सचिव पदी संदेश हुमणे
आबलोली
अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) मुंबई यांच्या विनंती वरुन गुहागर तालुका भजनी कलाकारांची रविवार दिनांक ०८ जून २०२५ रोजी गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात सभा उत्साहात संपन्न झाली या सभेला गुहागर तालुक्यातील जेष्ठ, श्रेष्ठ यांचेसह तरुण भजनी कलाकार उपस्थितीत होते.इतर कलाकारांना सरकार कडून सर्व फायदे मिळतात तसेच फायदे सरकार कडून भजन मंडळातील प्रत्येक कलाकारांना, प्रत्येक घटकाला मिळावे सरकारी अनुदान प्राप्त व्हावे यासाठी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) मुंबई यांच्या विनंती नुसार गुहागर तालुका भजनी कलाकार यांची अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका अशी नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी सागर मोरे (गुहागर), उपाध्यक्षपदी संतोष पांचाळ (शिवणे), सचिवपदी संदेश हुमणे(गुहागर), खजिनदारपदी अभय साटले (गुहागर) यांची निवड जाहिर करण्यात आली असून सदस्यपदी संदिप शिरधनकर (गुहागर बाग), महेंद्र वराडकर (गुहागर), सचिन जाधव (नरवण), सुधाकर पिलवलकर (निगुंडळ), जयराम ठाकूर (कोंडकारुळ), अरुण बागकर (गुहागर बाग), विनायक जोशी , प्रदिप साटले, शैलेश शेटे, आदेश मोरे, उमेश गोयथळे (गुहागर), सुहास चव्हाण (पालशेत), परवेश देवकर(आरे), सतिष मोरे, उमेश शिंदे (वेळणेश्वर) तर कायदेशीर सल्लागार पदी जिल्हा कमिटी साठी मयुरेश पावसकर, महेश होळंब (पालशेत), संदेश पोळेकर (कोंडकारुळ) आणि विभाग कमिटी साठी मिनार पाटील (पालशेत), मंदार जाधव (नरवण) यांची निवड जाहिर करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment