गुहागर तालुक्यातील हेदवी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

आबलोली 
गुहागर तालुक्यातील हेदवी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या निधीतून निर्माण करण्यात आलेल्या श्री.देव उमा महेश्वर यांच्या मंदिरात अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून श्री. देव उमा महेश्वर या मंदिरावराची साफसफाई करून मदिरात महा अभिषेक आणि महा आरतीचे आयोजन भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर या पक्षाचे वतीने करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पातळीवर सर्व ठिकाणी विविध कार्यक्रमांमधून अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणशेठ शिगवण यांनी गुरुजींच्या मंत्रोच्चारात पुजा व अभिषेक केला. यावेळी भाजपाचे गुहागर तालुका अध्यक्ष अभय भाटकर,माजी तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, सचिन ओक, मंगेश रांगळे, सुरेंद्र भाटकर, अपूर्वा बारगोडे,वेळंबचे उपसरपंच श्रीकांत मोरे,सुनिल बेकरे, मंगेश बारगोडे,संदिप हळदणकर, मच्छिंद्र नाटेकर आदी. कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

news.mangocity.org