आबलोली गावचे माजी सरपंच तुकाराम (दादा) पागडे यांचे दु:खद निधन
आबलोली
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीचे माजी सरपंच तसेच वरची पागडेवाडी विकास मंडळ आबलोली या मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक , आधार स्तंभ , शांत, संयमी व दुस-यांच्या सुख - दु:खात कायम धाऊन जाणारे व आबलोली गावचे सुपूत्र , माजी सरपंच तुकाराम (दादा) गुणाजी पागडे यांचे शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता हृदयविकाराचा तीव्र धक्याने वयाच्या ६५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने आबलोली पंचक्रोशीसह संपूर्ण गुहागर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै. तुकाराम (दादा) गुणाजी पागडे यांनी कोरोना काळात सरपंच म्हणून केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे.कै.तुकाराम (दादा) गुणाजी पागडे यांचे पाश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, मुलगी, जावई,भाऊ, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे कै. तुकाराम (दादा) पागडे यांचे सातवे गुरुवार दिनांक २२ मे २०२५ रोजी झाले असून रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी दशक्रिया व बारावे असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment