गुरुवार दि. १५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह जानवळे येथे महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सव

बौध्दजन सहकारी संघ(रजि.), भारतीय बुद्ध सासन सभा व शासकीय मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली
बौद्धजन सहकारी संघ(रजि.) तालुका गुहागर,भारतीय बुद्ध सासन सभा (रजि.)तालुका गुहागर व शासकीय मागासवर्गीय कर्मचारी संघटना तालुका गुहागर या धम्म संघटनांच्या वतीने व शासकीय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने गुहागर तालुक्यातील जानवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा २५६९ वा आणि विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा असा महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सभा अध्यक्षस्थानी बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष व माजी सभापती आणि रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीचे सभापती सुरेश (दादा) सावंत हे असून स्वागताध्यक्ष म्हणून भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे मुंबईचे सेक्रेटरी व बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक एस.एल.सुर्वे आणि विद्याधर राजाराम कदम हे असून या संपूर्ण जयंती महोत्सवाचे सुत्रसंचालन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका सरचिटणीस सुनिल गमरे व शासकीय मागासवर्गीय कर्मचारी संघटना तालुका गुहागर या संघटनेचे राजदत्त शिवराम कदम हे करणार आहेत. 
                 गुरुवार दिनांक १५ मे २०२५ रोजी महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त सकाळी १०:०० वाजता ध्वजारोहण त्यानंतर सकाळी १०:०५ ते १०:३० या वेळेत पुज्य भिक्खू विमल बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध पुजापाठ घेण्यात येणार असून दुपारी १२:०० ते १२:०५ या वेळेत भारतीय राज्य घटनेची प्रास्ताविका उद्देशिकेचे अनावरण करण्यात येणार असून दुपारी १२:०५ ते ०२:०० या वेळेत मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार असून जाहिर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे चेअरमन मारुती मोहिते हे करणार आहेत तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून सम्मासंम्बुद्ध चे संपादक संजय गमरे हे मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर दुपारी ०२:०० ते ०३:३० या वेळेत उपस्थित सर्वांसाठी भोजनदान दिले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ०४:०० ते ०५:३० या वेळेत पुज्य भिक्खू विमल बोधी यांची धम्मदेसना होणार आहे. 
                  या जयंती महोत्सवाला गुहागरचे तहसीलदार परिक्षीत पाटील, पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे विश्वस्त यांना विशेष करुन आमंत्रित करण्यात आले आहे. या महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाला गुहागर तालुक्यातील बौद्ध धम्म बंधू-भगीनी आणि बालकांनी वेळेत बहूसंख्येने उपस्थित रहावे असे जाहिर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.),भारतीय बुद्ध सासन सभा (रजि.)तालुका गुहागर व शासकीय मागासवर्गीय कर्मचारी संघटना तालुका गुहागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments