दिवाणी न्यायालय गुहागर येथे राष्ट्रीय लोकअदालतीत सुमारे 13 हजार 233 प्रकरणे निकाली
गुहागर
गुहागर दिवाणी न्यायालय येथे आयोजित राष्ट्रीय लोकअदालत मध्ये सुमारे 5 केसेस व 13 हजार 228 प्रीलिटीगेशन मॅटर अशे एकूण 13 हजार 233 प्रकरणे निकाली करण्यात आली. यामध्ये रुपये 71 लाख 43 हजार 485 इतक्या रकमेची सेटलमेंट करण्यात आली यामध्ये पॅनल प्रमुख म्हणून तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष गुहागर तथा दिवाणी न्यायाधीश पी.व्ही.कपाडीया, तसेच पॅनल विधीज्ञ म्हणून अक्षता संजय कदम यांनी काम पाहिले. यामध्ये 2 पोटगीच्या केस निकाली झाल्या त्यापैकी एक केसेस मध्ये एका पती पत्नीच्या वादात सलोखा होऊन नव्याने संसाराला सुरवात झाली.
Comments
Post a Comment