तालुकास्तरीय ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेत समृद्धी योगेश गोवळकर हिने पटकावला द्वितीय क्रमांक
आबलोली:
गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागर, यांच्यातर्फे आयोजित ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेत गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या प्रशालेची इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी योगेश गोवळकर हिने प्राथमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या ऑनलाईन स्पर्धेत गुहागर तालुक्यातून बहुतांशी शाळांनी सहभाग घेतला होता.
कु. समृध्दी योगेश गोवळकर हिच्या उज्वल यशाबद्दल विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक श्री. प्रसना वैद्य यांनी मौलिक मार्गदर्शन केले तर प्राचार्य श्री. डी.डी.गिरी यांची प्रेरणा लाभली तसेच लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत व सर्व संस्था कार्यकारिणीने कु. समृद्धी योगेश गोवळकर हिचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment