माजी पोलिस पाटील आणि लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे कोषाध्यक्ष रमाकांत (नाना) विष्णू साळवी यांच्या ७१ व्या जन्मदिनी आबलोली - खोडदे पंचक्रोशीतील गरजू,होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
आबलोली:
गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे माजी पोलिस पाटील आणि लोकशिक्षण मंडळ आबलोली या शैक्षणिक संस्थेचे कोषाध्यक्ष रमाकांत (नाना) विष्णू साळवी यांचा ऐकाहत्तरी जन्मदिन सोहळा त्यांच्या निवासस्थानी शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी रमाकांत साळवी मित्र मंडळ,साळवी परिवार, आप्तेष्ट आणि श्री. गजानन होतकरु संघ खोडदे देऊळवाडी यांनी या विविध स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वी मधील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी श्री. रमाकांत (नाना) विष्णू साळवी यांचे चिरंजीव श्री. राकेश साळवी, मुख्याध्यापक श्री. डि.डी.गिरी यांचेसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment