नागरिकांकडून राजे धर्मराव महाराज यांची पुण्यतिथी

नागरिकांकडून राजे धर्मराव महाराज यांची पुण्यतिथी

By दिपक चुनारकर गडचिरोली (वेलगूर )
अहेरी इस्टेटचे प्रथम राजे धर्मराव महाराज यांची राजघाटावर तसेच दानशूर चौकातील पुतळ्याला माजी पालकमंत्री राजे अमरीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मान्यवराच्या हस्ते पुष्पांजली वाहून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ.मनोरंजन मंडल, प्राचार्य महेश वाढइ, प्राचार्य संजय कोडेलवार, प्रकाश गुडेलीवार, मुख्याध्यापक तालीब सय्यद, संतोष उरते ,गिरीश मदेर्लावार, दिलीप मडावी, शेषराव दिवसे, प्रा. रमेश हलामी, प्रा डॉ. सुनंदा पाल, प्रा. वनकर, काशिनाथ गोंडे, सचिन पैदापल्लीवार,जनार्दन झाडे,आतिश दोनतुलवार, विशाल बंडावार,मुकेश गोंगले, रवी जोरगेलवार, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे,गावचे पोलीस पाटील,प्रतिष्ठित नागरिक , कार्यकर्ते व इतर गावकरी यावेळी उपस्थित होते.

Comments