रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा आणि घाणीचे साम्राज्य

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणावर कचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने या भागात हॉटेल्समध्ये तसेच अन्य दुकानात येणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारीत ही क्रीडा संकुल येत असून संपूर्ण जिल्ह्यातून क्रीडा प्रेमी इथे येत असतात. सध्या या क्रीडा संकुलाचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्य प्रवेशद्वार गेले काही दिवस बंद असल्याची माहिती आहे. मात्र या ठिकाणी प्रवेशद्वारासमोरच वाहन पार्किंग केले जाते. त्याचप्रमाणे या परिसरात कचरा टाकण्यात येतो आहे. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाला या भागाची स्वच्छता करण्यास काही अडचण आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Comments