विद्यार्थ्यांना पाणी पिण्याचे बॉटल भेट देऊन केला मुलाचा वाढदिवस साजरा. वेलगूर येथील चुनारकर दम्पत्याचा उपक्रम
** जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, वेलगुर ** ** वाढदिवस विशेष ** विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वितरण चुनारकर दम्पत्याचा उपक्रम
By दिपक चुनारकर गडचिरोली (वेलगूर )
वेलगूर :-दिनांक ०७/०४/२०२५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, वेलगुर येथील ५वीत अध्ययन करणारा होतकरु विद्यार्थी चिरंजीव हर्षदीप हर्षाताई दिपकराव चुनारकर याचा " वाढदिवस " त्यांचे पालक व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. या छोटेखानी समारंभाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ.हर्षाताई दिपकराव चुनारकर यांनी भुषविले , तर विशेष अतिथी म्हणून श्री दिपकराव चुनारकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रभाकर आचेवार, ज्येष्ठ शिक्षक श्री रमेश कुसनाके , श्री विनोद खांडेकर, श्री गणेश सुर्तेकर , ज्येष्ठ शिक्षिका कुमारी वंदना ऐलावार, शारदा रापर्तीवार, मिनाक्षी कुमरे , प्रियंका चुनारकर व श्रीमती शकुंतलाताई गुरनुले आदि उपस्थित होते. यावेळी चिरंजीव हर्षदीप दिपकराव चुनारकर यांचे पालक सौ.हर्षाताई दिपकराव चुनारकर यांचे कडून उपस्थित एकूण 168 शालेय विद्यार्थ्यांना पिण्याचे बाँटल्सचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी श्री दिपकराव चुनारकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर उद्बोदनातुन शालेय होतकरू व गरीब विद्यार्थ्यांप्रति आस्था असून सामाजिक बांधिलकी म्हणून यापुढेही ही परंपरा शालेय विद्यार्थ्यांकरीता कायम राहिल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यापुर्वीही त्यांनी आपले पाल्य कुमारी हार्दिका हीचे वाढदिवसाप्रसंगी संपूर्ण शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व लेखन साहित्य वितरीत करुन सामाजिक बांधिलकी व विद्यार्थी आस्था जोपासली, हे विशेष. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक बंधु - भगिणींनी व सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजक पालक सौ. हर्षाताई दिपकराव चुनारकर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री गणेश सुर्तेकर यांनी केले , तर आभार ज्येष्ठ विषय शिक्षक श्री विनोद खांडेकर यांनी मानले.
Comments
Post a Comment