रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनाला आलंय गोडाऊनचे स्वरूप!, प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला राज्यातील महायुती सरकारच जबाबदार: काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन यांची टीका
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनाला गोडाऊनचे स्वरूप आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनाची अशी स्थितीला महायुती सरकारच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालयांना १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला आहे. या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा परिषदेने अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेची स्वच्छता तसेच रंगरंगोटी अशा विविध कामांना सुरुवात केली आहे. मात्र हे काम करत असताना जिल्हा परिषदेची अभिलेख, तसेच अन्य अडगळीत, मोडके तोडके सामान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्याच दालनात टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे महत्त्वाचे घटनात्मक पद आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्यातील महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेतलेल्या नाहीत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेची सुद्धा निवडणूक न झाल्याने आणि तिथे लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्हा परिषदेवर कुणाचा अंकुशच राहिला नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे हे उत्तम उदाहरण असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनाचे महत्त्वच जिल्हा परिषदेचे प्रशासन विसरले आहे का असा सवाल हारीस शेकासन यांनी उपस्थित केला आहे.
Comments
Post a Comment