शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची अखिल भारतीय कृषी अनुसंधान आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांसाठी उत्तर प्रदेश येथे निवड
आबलोली :
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय खरवते - दहिवली येथील विद्यार्थ्यांची अखिल भारतीय कृषि अनुसंधान परिषद,नवी दिल्ली यांचे संलग्न आचार्य नरेंद्र देवा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ,अयोध्या ( उत्तर प्रदेश) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी यशस्वी निवड करण्यात आली आहे.दि.०२ मे ते ०५ मे दरम्यान घेण्यात येणा-या या भव्य क्रीडा स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी कु.अमिश माने,कु.शिवराज पाटील,कु.सोहम मोरे यांची कबड्डी (मुले) या क्रीडा प्रकारात व कु.चेतन पावरा,कु.सुबोध पोळ,कु.प्रफुल्ल वायकर व कु.तेजस भेलके यांची खो-खो(मुले) क्रीडा प्रकारात निवड करण्यात आली आहे. तसेच व्हॉलीबॉल (मुले) क्रीडा प्रकारात कु.सचिन पाटील व कु. प्रशांत साळुंके यांची निवड झाली आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्था,सावर्डेचे कार्याध्यक्ष आमदार श्री.शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन करत होणा-या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. निवड झालेले हे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली च्या संघाचे प्रतिनिधित्व करणार असुन विद्यापीठ संघातील ३० खेळाडूंपैकी ०९ खेळाडू हे शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाचे आहेत.या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील,क्रीडा निर्देशक प्रा.सुहास आडनाईक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Comments
Post a Comment