सोमवारी २८ एप्रिल २०२५ रोजी वेळणेश्वर येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
आबलोली
इंटरनॅशनल लॉंजेव्हिटी सेंटर इंडिया आयोजित व घराडा केमिकल्स लिमिटेड प्रायोजित, बाई रतनबाई घराडा हॉस्पिटल, लवेल साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे जेष्ठ नागरिक (वय वर्ष ५५ च्या पुढे) स्त्री व पुरुषांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ४:३० वाजेपर्यंत स्थळ - विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्प, वेळणेश्वर, पिंपरी रोड, वदईच्या आधी, महावितरण सब स्टेशनच्या मागे हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात भाग घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी स्वत:चे आधारकार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटो घेऊन यावा, नावनोंदणी व भविष्यातील सवलती मध्ये उपचारांसाठी अनिवार्य आहे. विशेष करून हे शिबिर सर्व रोग निदान शिबिर असून या शिबिरात रक्ततपासणी,ईसीजी ,रक्तदाब व रक्तशर्करा तसेच रोग निदान मोफत केले जाणार असून पुढील चाचण्या व उपचारांवर सवलती आहेत. अधिक माहितीसाठी सुशांत मो. नं. ९५६१३२७८७३,नंदकुमार मो. नं. ७२७६६९५५४० यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी वेळणेश्वर पिंपर फाटा ते आश्रम पर्यंत मोफत वाहन सेवा ठेवण्यात आली आहे.
Comments
Post a Comment