पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांचे साहित्य पुरस्कार जाहीर

आबलोली:
पसायदान प्रतिष्ठान गुहागर ही संस्था २०१४ पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिवर्षी तीन साहित्यिकांना उत्कृष्ट कलाकृतीसाठी सन्मानित करण्यात येते. २०२४ मधील कलाकृतींना यावर्षी सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रभरातून कादंबरी,कविता,ललित या वांड्मय प्रकारांमध्ये असंख्य कलाकृती प्राप्त झाल्या. त्यामधून तज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या कलाकृतींना पसायदान प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आले आहेत.ते पुढीलप्रमाणे आहेत‌.
*पुरस्कारप्राप्त* *कलाकृती* 
*कादंबरी विभाग*
*डॉ.नागनाथ कोत्तापल्ले उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार* 
"द लाॅस्ट बॅलन्स" रामदास खरे (ठाणे)
स्वरूप:रोख रक्कम ३०००₹सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ, 
*कविता विभाग*
 *पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार* 
"तुझे शहर हजारो मैलावर"सुनिता डागा (पुणे)
स्वरूप:रोख रक्कम ३०००₹सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ ,
ललित विभाग
 *विंदा करंदीकर ललित वाड्मय पुरस्कार*
"कपाळ गोंदण" निशा डांगे (अमरावती)
 रोख रक्कम स्वरूप:३०००₹सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ ,
असे आहे. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना कोल्हापूर येथे ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये हिंदीतील ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक गोपाल (सहर) शर्मा यांच्या हस्ते शाहू स्मारक मंदिर येथे दि. ११ मे २०२५ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments