गुहागर ते विश्रामगृह रस्त्याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेण्यासाठी गुहागर प्रेमी नागरिकांची रविवारी २० एप्रिल रोजी महत्वाची बैठक

आबलोली:
 गुहागर ते शासकीय विश्रामगृह पर्यंत चा प्रमुख मार्ग अत्यन्त खराब आणि धोकादायक बनला आहे वाहतूकिसाठी योग्य नाही वारंवार सांगून आणि निदर्शनास आणून देखील संबंधित अधिकारी व ठेकेदार या महत्वाच्या मागणीकडे लक्ष देत नाहीत याबद्दल निषेध व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या रविवारी दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी गुहागर येथील वाहन चालक व मालक तसेच येथील जागृत नागरिक यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे तरी या मीटिंगला समस्त नागरिकांनी सकाळी ११:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जानकी निवास येथे उपस्थितीत रहावे असे आवाहन पत्रकार पराग कांबळे व सामाजिक कार्यकर्ते विशवनाथ रहाटे यांनी केले आहे. 
                   यापूर्वी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता या आंदोलनाचे पूर्व तयारीची बैठक उद्या रविवारी होतं आहे 
            या बाबत सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनात या गंभीर विषयावर मोठी चर्चा करून जाब विचारण्यात येणार आहे योग्य निर्णय ना झाल्यास एक मे रोजी उपोषण तयारी व त्या नंतर पंधरा दिवसांनी मुख रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर गुहागर स्टाईल ने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार पराग कांबळे, विशवनाथ रहाटे, विकास जाधव, शाम साटले, बाबुशेट गुहागरकर, वसंत बेटकर, प्रभूनाथ देवळेकर, विद्याधर गोयथळे,ॲड.दिनेश कदम, विकास भागडे,प्रवीण साटले, आदी.नी दिला आहे 
          गुहागर हे जागतिक पर्यटन केंद्र आहे असे असले तरी प्रवेश द्वाराचा मुख्य रस्ता खराब आहे प्रशासन अधिकारी सुद्धा या बाबत काहीच करीत नाहीत तर लोकप्रतिनिधी यांना काहीच पडलेले नाही असा घणाघाती आरोप पराग कांबळे यांनी केला आहे रस्ता खराब असल्याने अपघात होतं आहेत सर्वसामान्य जनतेचे वाहन चालक व मालक व नागरिक यांचे बेहाल होतं आहेत या बाबत चर्चा व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जागृत नागरिकांनी बैठकीला वेळेवर उपस्थिती त रहावे असे आवाहन पराग कांबळे यांनी केले आहे.

Comments