मनसेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने "एक समाज एक संघ", समाज एकता मनसे चषक" क्रिकेट स्पर्धांचे आयोजन १२ समाजातील अष्टपैलू खेळाडूंचा सहभाग

आबलोली:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (गुहागर विधानसभा क्षेत्र) गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने "एक समाज एक संघ, समाज एकता मनसे चषक २०२५"गुहागर विधानसभा क्षेत्र मर्यादित क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शुक्रवार दिनांक ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ रोजी गोल्डन पार्क, शृंगारतळी जानवले फाटा येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.गुहागर तालुक्यात प्रथमच "एक समाज एक संघ" अशी स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकात ५० हजार रुपये, तृतीय क्रमांकास २० हजार रुपये व "समाज एकता मनसे चषक" प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये खारवी समाज (सागरी योद्धा), भंडारी समाज (टायगर योद्धा), सुतार समाज (विराट विश्वकर्मा), भाविक गुरव समाज (जीपीएल यंग स्टार), मुस्लिम समाज (आझाद रॉयल फायटर्स), वैश्य वाणी समाज (कोकण कट्टा), नंदीवाले समाज (श्री तिरुपती बालाजी),, तेली समाज (जय संताजी), बौद्ध समाज (ब्लू पँथर्स), बेलदार समाज (ओम साई इलेव्हन), कुणबी समाज (भूमिपुत्र फायटर्स), मराठा समाज( स्वराज्य रक्षक) असे एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण बारा समाजातील अष्टपैलू खेळाडूंचा सहभाग असणार आहे. एक समाज एक संघ या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित करण्याचा तसेच सर्व समाजातील अष्टपैलू खेळाडूंना एकसंघ करण्याचा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा प्रयत्न असणार आहे. तरी या स्पर्धेसाठी सर्व समाजातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी केले आहे.

Comments