प्रज्ञाशोध परीक्षेत चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयाची कु.आराध्या पवार तालुक्यात द्वितीय

आबलोली :
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ - २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेत गुहागर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ संचलित चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या प्रशालेत इयत्ता सहावी मध्ये शिकणारी कुमारी आराध्या अमोल पवार या विद्यार्थ्यीनीने इयत्ता पाचवी ते सातवी या गटात तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
       डिसेंबर २०२४ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या गुणवत्तेचा शोध घेत त्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयार करण्यासाठी ही परीक्षा शालेय स्तरावर अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. आबलोली विद्यालयाच्या कुमारी आराध्या पवार हिने द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक डी.डी. गिरी यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments