नेत्रावती व मत्स्यगंधा या गाड्यांना जनरल डबे वाढवावेबळीराज सेना जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांची रेल्वे प्रशासनकडे मागणी

आबलोली:
मुंबई येथून कोकणामध्ये येणाऱ्या मत्स्यगंधा व कोकण कन्या एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना प्रचंड प्रवाशांची गर्दी होत असून या दोन्ही गाड्यांना जनरल डबे पुढे आणि मागे वाढवावेत यामुळे आमच्या कोकणातील सर्वसामान्य प्रवाशी जनतेचे प्रवासात हाल होणार नाहीत रेल्वे प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घ्यावी आणि जनरल डबे वाढवावे अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार पराग कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे
               कोकणातील जनता हे प्रामुख्याने मुंबई शहरांमध्ये नोकरी धंदा निमित्त आणि व्यवसाय निमित्त ये जा करीत असते कोकण रेल्वेच्या जनरल डब्यांच्या गाड्या प्रवासासाठी असले तरी या गाड्याना आवश्यक गती नसल्याने प्रवासी मत्स्यगधा व नेत्रवती या गड्याने प्रवास करतात तात्काळ तिकिटामध्ये जनरल डब्यातून प्रवास करतात जनरल डबे ते जाग्यावरच फुल होतात पुढील प्रवाशाला या डब्यामध्ये चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागते काही प्रवासी जीवावर उदार होऊन प्रवास करतात तरी रेल्वे प्रशासनाने या गंभीर स्थितीची दखल घेऊन जनरल डबे वाढवावेत हो कोकणातील प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी पराग कांबळे यांनी केली आहे.

Comments