आबलोलीत जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा
निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि महिला बचत गटांचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील डि. एड्. कॉलेजच्या सभागृहात जागतिक महिला दिन स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि आबलोली मधील बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ. स्नेहल बाईत,एम.बी.बी.एस.डॉ.गौरी काटदरे,सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके आणि ग्रामपंचायत सदस्या यांचे हस्ते सावित्रीबाई फुले, जिजाबाई यांच्या प्रतिमेचे पुजन , दीपप्रज्वलीत करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर "इतनी शक्ती हमें देना दाता..!मन का विश्वास कमजोर हो ना..!" हे प्रार्थना गित म्हणण्यात आले.
त्यानंतर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ. स्नेहल सचिन बाईत, डॉ. गौरी काटदरे, सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, उद्योजिका सौ. उज्वला उदय पवार यांचा शाल, श्रीफळ, आणि पुष्पगुच्छ देऊन जाहिर सत्कार करुन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले, सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सौ. स्नेहल सचिन बाईत, डॉ. गौरी काटदरे, सरपंच सौ वैष्णवी नेटके, माजी सरपंच सौ. श्रावणी पागडे, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती. नम्रता निमूणकर यांनी महिलांना मौलिक मार्गदर्शन केले
त्यानंतर ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांनी जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला त्यानंतर महिलांचे फणी गेम्स घेण्यात आले यामध्ये तळ्यात मळ्यात या स्पर्धेत सौ. सुकन्या सखाराम मते हिने प्रथम क्रमांक पटकावला तर समिक्षा संदेश पवार हिने व्दितीय क्रमांक पटकावला तसेच बॉल पास स्पर्धेत सौ. स्नेहल सचिन बाईत यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सौ. वृषाली विजय वैद्य यांनी व्दितीय क्रमांक पटकावला तसेच संगित खुर्ची स्पर्धेत सौ. पायल प्रमोद गोणबरे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर सौ. सुकन्या सखाराम मते हिने व्दितीय क्रमांक पटकावला या सर्व स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्याणी प्रसाद नेटके यांनी केले तर अध्यक्षीय भाषणाने सरपंच सौ वैष्णवी नेटके यांनी या कार्यक्रमाची सांगता केली. या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली मधील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment