पाणी वाचवा, पाण्याशिवाय जिवन व्यर्थ - गटविकास अधिकारी शेखर भिलारे
आबलोली (संदेश कदम)
पाण्यामुळे शेती होते. यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे पाणी हेच आपले जीवन आहे. आपले जीवन जगायचे असेल तर शेती महत्वाची आणि शेती जगवण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे पाण्याशिवाय आपण शेतीचे उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. आपण जंगल तोड करतो, सिमेंटची जंगले ऊभारतो त्यामुळे पाण्याचे स्तोत्र कमी होत चालले आहे आपण झाडे लावली नाही तर भविष्य धोक्यात आहे. आपण झाडे लावूया..!,पाण्याची बचत करुया.!पाणी वाचवूया..!, पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे असा स्पष्ट संदेश पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिला.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील डि. एड्. कॉलेज आबलोलीच्या भव्य सभागृहात स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने पाणलोट क्षेत्र रथयात्रा व विविध कार्यक्रम आणि जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम सत्रातील कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे हे मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
गटविकास अधिकारी शेखर भिलारे पुढे म्हणाले की, आज जागतिक महिला दिन आहे त्यामुळे सर्व महिला, भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. भारत हा कृषी प्रधान देश आहे ५० % ते ६०% लोक कृषीवर अवलंबून आहोत कृषीचे देशाच्या जिवीतीमधून योगदान बघीतले तर आपण फक्त १७% लोक आहोत जे ५०%ते६०% ज्या क्षेत्रात काम करतात ते क्षेत्र फक्त १७% त्यामुळे माझा शेतकरी कसा जगू शकतो देशात शेतक-यांच्या आत्महत्या होताहेत. जालना, तेलंगणा, महाराष्ट्र येथे प्रत्येक वर्षी ७ ते ८ हजार शेतकरी आत्महत्या करतात आणि हे का होते तर शेती आपल्याला करायची असेल जगवायची असेल तर आपण पाणी वाचवले पाहिजे पडणाऱ्या पावसाचे पाणी आपण नियोजन बध्द अडविले पाहिजे यासाठी झाडे लावा झाडे जगवा, निसर्ग वाचवूया..!निसर्गाचे रक्षण करुया..!,असा मौल्यवान संदेश पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिला
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा निलम पालव मॅडम, पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, दिल्ली येथील भूमी संधारण विभागाच्या टेक्निकल एक्सपर्ड श्वेता नारायण मॅडम, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गुहागरचे उप अभियंता मंदार छत्रे, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी,राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आबलोली मधील प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर, काजुर्ली गावच्या सरपंच मेघना मोहिते, काजुर्लीचे माजी सरपंच डॉ.आनंद जोशी,तंटामुक्ती समीती आबलोलीचे अध्यक्ष आप्पा कदम,आबलोलीच्या बचतगटाच्या सीआरपी मिनल कदम, मुख्याध्यापिका नेत्रा रहाटे, उपसरपंच अक्षय पागडे आदी. मान्यवर उपस्थित होते यावेळी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पांचाळ यांनी केले तर हा संपूर्ण कार्यक्रम स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला.
Comments
Post a Comment