पाचेरी सडा येथे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा
त्रिमूर्ती सेवा ग्राम विकास मंडळ पाचेरी सडा या मंडळाचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा येथे जागतिक महिला दिन ग्रामसंघाच्या अध्यक्षा सुदिक्षा संतोष डिंगणकर यांचे अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे नेतृत्व अंगणवाडी सेविका संध्या संतोष आंब्रे,अक्षता काशिनाथ पंड्ये, मानसी मनोज ठोंबरे,मदतनीस सविता सदू डिंगणकर,आशा स्वयंसेविका साक्षी संतोष यादव,नंदिनी नारायण डिंगणकर, यांनी विशेष प्रयत्न केले.त्रिमूर्ती सेवा ग्राम विकास मंडळ पाचेरी सडा या मंडळाने हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला होता.
या जागतिक महिला दिन कार्यक्रमाला माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती. निलम शांताराम वाघे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना मौलिक मार्गदर्शन केले त्यानंतर गावातील प्रत्येक वाडीतील महिलांनी मनोगत व्यक्त करुन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला मेळावा, हळदी कुंकू समारंभ आणि महिलांसाठी फणी गेम्स(संगित खुर्ची) महिलांचे उखाणे हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले हा जगतिक महिला दिन यशस्वी करण्यासाठी त्रिमूर्ती सेवा मंडळा पाचेरी सडा या मंडळाचे सचिव संतोष आंब्रे, खजिनदार अनिल जोशी,मुंबई मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पंड्ये,विजय डिंगणकर,आशिष मोरे, पाचेरी सडा ग्रामपंचायत अधिकारी श्री. पावरा यांच्यासह गावातील पुरुष मंडळी व महिला मंडळी बहूसंख्येने उपस्थित होते या सर्वांचे या संपूर्ण कार्यक्रमाला मौलिक योगदान लाभले.
Comments
Post a Comment