दापोली शहरांमध्ये संपूर्ण मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण पर्यटकांमध्ये नाराजी, नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

दापोली शहरांमध्ये संपूर्ण मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण पर्यटकांमध्ये नाराजी
  नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

 *दापोली*-दापोली शहर स्वच्छ आणि सुंदर वसुंधरा पुरस्कार घेतलेले शहर आज संपूर्ण अस्वच्छतेचे शहर बनले आहे या ठिकाणी संपूर्ण भारत देशातून तसेच जगभरातून पर्यटक हे सुंदर व स्वच्छ समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी येत असतात. परंतु या शहरांमध्ये फिरत असताना पर्यटकांना संपूर्ण अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे संपूर्ण बाजारपेठ एसटी स्टँड परिसर या ठिकाणी सर्व रस्त्यावर मासे विकले जातात व एक दुर्गंधी पसरली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच फूटपाथ वरती हे छोटे छोटे व्यवसाय दुकानांचे  लावलेले बोर्ड आहेत  रस्त्यावरही अतिक्रमण असल्यामुळे पर्यटकांना जाता येता त्रास सहन करावा लागत आहे तसेच बऱ्याच वेळा एक्सीडेंट होण्याच प्रमाण वाढत आहे त्याही गोष्टीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे पर्यटकांना फुटपात वरून चालण्यासाठी सुद्धा जागा नाही. दापोली हे मिनी महाबळेश्वर व पर्यटन स्थळ आहे त्यामुळे पर्यटकांचा दापोलीकडे येण्याचा ओघ कमी होत आहे. तसेच मुख्य शहराच्या स्वागतास्थळी रस्त्याला पडलेले खड्डे यामुळे ही पर्यटकांमध्ये नाराजी आहे. तरी लवकरात लवकर नगरपंचायत प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष घालून आपल्या शहराचा विकास तसेच येणाऱ्या पर्यटकांना चांगली रस्ते स्वच्छ शहर अशा प्रकारे स्वागत करावे तरच आपल्या शहराचा व्यवसायिकांचा व्यवसाय वाढेल.

      

Comments