जागतिक महिला दिनी आबलोली येथील सौ.मिनल संदेश कदम यांचा "पाणलोट धारिणीताई" पुरस्काराने गौरव

आबलोली (संदेश कदम)
वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि पाणलोट क्षेत्र रथयात्रा विविध कार्यक्रमात डि. एड. कॉलेज आबलोलीच्या सभागृहात दिल्ली येथील भुमी संधारण विभागाच्या टेक्निकल एक्सपर्ड श्वेता नारायण मॅडम यांचे हस्ते गुहागर तालुक्यातील आबलोली येथील माजी ग्रामपंचायत सदस्या आणि बचतगटाच्या सीआरपी सौ. मिनल संदेश कदम यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक - २.० पाणलोट यात्रा "पाणलोट धारिणीताई" पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले, सन्मानित करण्यात आले 
                           यावेळी विचारपीठावर गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे,जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा निलम पालव मॅडम, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गुहागरचे उप अभियंता मंदार छत्रे,आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके,ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, काजुर्ली गावच्या सरपंच सौ. मेघना मोहिते, काजुर्लीचे माजी सरपंच डॉ. आंनद जोशी, आबलोली तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पा कदम, मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, उपसरपंच अक्षय पागडे आदी. मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती यांचे संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पांचाळ यांनी केले.

Comments